आम्ही उद्योगांसाठी रेड कारपेट टाकतोय तर उद्योगांनीही स्थानिकांसाठी ग्रीन सिग्नल ठेवावा – आ. किशोर जोरगेवार

0
104

आम्ही उद्योगांसाठी रेड कारपेट टाकतोय तर उद्योगांनीही स्थानिकांसाठी ग्रीन सिग्नल ठेवावा – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूरात आजवर प्रदूषण निर्माण करणारेच उद्योग आलेत. पिरणामी 40 टक्के पेक्षा अधिक वन आच्छादन असुनही चंद्रपूर जिल्हा प्रदुषणाच्या बाबतीत देशात ओळखला जातो. असे असतांनाही आम्ही उद्योगांसाठी रेट कारपेट टाकत आहोत. तर उद्योगांनीही आपल्या उद्योगात स्थानिकांसाठी कायम ग्रिन सिग्नल ठेवावा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
महाराष्ट्र औद्योगीक विकास मंडळ, जिल्हा प्रशासन आणि एम.आय.डी सी असोशिएशनच्या वतीने अॅडव्हान्टेज चंद्रपूर 2024 इंडस्ट्रिीयल एस्पो आणि बिजझनेस कॉन्व्लेव्हरचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला वन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, जिल्हाधिकारी विनय गौडा, एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर हे देशाच्या मध्यभागी असलेले ठिकाण आहे. येथे दळनवळणाची साधने आहे. विज, पाणी, कोळसा, भूमी या सर्व गोष्टी येथे उपलब्ध आहेत. एंकदरित विचार केल्यास उद्योग वाढीसाठी पूरक असे वातावरण चंद्रपूरात आहे. त्यामूळे येथे उद्योग आले पाहिजे. मात्र हे उद्योग येथे येत असतांना स्थानिकांचाही विचार होणे अपेक्षित आहे. यातुन स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती व्हावी असेही ते यावेळी म्हणाले.
चंद्रपूरात पाच हजार मेगावॅट पेक्षा अधिक विज आम्ही उत्पादीत करतो. ही थर्मल एनर्जी आहे. त्यामुळे प्रदुषणाचा सामना आम्हाला करावा लागत आहे. मागील वर्षी 30 पैकी 30 दिवस प्रदुषीत राहिल्याचा अहवाल आला आहे. असे असताना या विद्युत केंद्राचा फायदा आम्हाला नाही. त्यामुळे मोबदला स्वरूप जिल्ह्याच्या विकासासाठी उद्योगांना सवलतीच्या दरात विज दिल्या गेली पाहिजे असेही ते यावेळी बोलतांना म्हणाले. या कार्यक्रमात उद्योजकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here