राजुरा येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

0
122

राजुरा येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

श्री. संत गाडगेबाबा धोबी, वरठी समाज मंडळ राजुरा च्या वतीने निष्काम, कर्मयोगी श्री. संत गाडगेबाबा, यांच्या 148 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन राजुरा नगरीत श्री. संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था रामपूर राजुरा येथे पार पडला.

सर्व प्रथम गाडगेबाबा, तुकडोजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले. उपस्थित पाहुणे मंडळीचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमांचे प्रास्ताविक मुरलीधर श्रीकोंडावार अध्यक्ष बहुद्देशीय संस्था राजुरा व राजकुमार चिंचोलकर तालुका अध्यक्ष धोबी समाज राजुरा, संचालन श्री. मनोहर वाघमारे आभार प्रदर्शन रमेश लोणारे यांनी केले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी सत्कार, राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार प्राप्त, मोफत नेत्र तपासणी शिबीर, वधू वर परिचय मेळावा तथा सप्त खंजेरी वादक ह. भ. प. उदय पाल महाराज वणीकर, यांचे समाज प्रबोधन पर कीर्तन आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम आयोजक राजकुमार चिंचोलकर अध्यक्ष धोबी समाज राजुरा, मनोहर वाघमारे कार्याध्यक्ष, नत्थू वाघमारे, रमेश बेसूरवार, मुक्तेश्वर श्रीकोंडावर, संजय भोजेकर, मनोज नांदे, सचिन क्षीरसागर, जगदीश क्षिरसागर, संतोष नांदेकर, संतोष तुराणकर, रविता केडझडकर, मीराताई ताजने, सुनिता तुराणकर, सविता बेसूरवार, शितल लोणारे, साईनाथ लोणारे, बंडू वाघमारे, संजय रेगुंटावार, राजेंद्र मादासवार, रामेश्वर धानोरकर, आशिष आकनूरवार, साईनाथ आकनूरवार, नंदकिशोर कोंडावार, संतोष तुराणकर, पंकज बेसूरवार इत्यादी कार्यकर्त्या च्या साहाय्याने कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ मुक्के जिल्हाध्यक्ष, अशोक तुराणकर किशोर सेलूकर धोबी समाज नेते यवतमाळ, मनोहर आगुटले, पंढरीनाथ क्षिरसागर, समाजभूषण जयप्रकाश निर्मल सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रपूर, डॉ. किशोर लांजेवार साहेब, संतोष नांदेकर, गणेश क्षिरसागर जिल्हाध्यक्ष धोबी समाज भंडारा, अशोक तुराणकर, लटारुजी मत्ते, बंडू दुरुडकर, उद्धव नांदे, मिलिंद व अमोल लोणारवार इत्यादी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमात समाजातील समस्या आरक्षण बाबत, जातीचा एकच सिरीयल नंबर करण्या बाबत आणिइतर समस्यावर जिल्हाध्यक्षानी प्रकाश टाकला.

राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार प्राप्त नेते श्री. विश्वनाथ मुक्के जिल्हाध्यक्ष धोबी समाज चंद्रपूर, श्री. नामदेवराव लोणारवार सर, शिक्षक व समाज कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी सर्वांनी राष्ट्रवंदना घेऊनव महाप्रसाद सेवन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here