संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी धम्म परिषद – ठाणेदार अविनाश मेश्राम

0
167

संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी धम्म परिषद – ठाणेदार अविनाश मेश्राम

शिवनपावली येथे दोन दिवसीय धम्म परिषद

तालुका प्रतनिधी
चिमूर :- सध्याच्या स्थितीत समाज दिशाहीन होत चालला आहे. समाजात अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती वाढीस लागल्या आहेत. समाज बुद्धाची शिकवण विसरला आहे. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी धम्म परिषदांचे आयोजन केले जाते, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम मुल यानी उद्धाटन पर मनोगतात वेक्त केले.

शिवनपायली ता चिमूर येथे मिलींद बुद्ध विहार नागसेन वन धम्मभुमी बहुउददेशिव स्मारक मंडळानी दिनांक २ फेब्रवारी व ३ फ्रेबुवारी रोजी नागसेन वनभुमी मध्ये सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या स्मृतीदिना निमित्य दोन दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यात धम्म रॅली, ध्वजारोहन, बुद्धवदंना,धम्म क्रांतीचे पाच सुत्रे, बाबासाहेबांना अपेक्षित समाज निर्मिती,या विषयाला अनुसरून मान्यवर मंडळीने मार्गदर्शन केले. ज्यानी समाजाप्रती मोलाचे सहकार्य केले असा मान्यवर मंडळी चा शाल सन्मानपत्र देउन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पि.एम.डांगे वरोरा,उद्घाटक पोलिस निरीक्षक मुल अविनाश मेश्राम,मार्गदर्शक प्रा.अनुपकुमार नालंदा अकॅडमी वर्धा,प्रा.डाॅ.दिलीप पाटील अलिबाग मुंबई, प्रा.संजय बोधे वरोरा,सतीशभाऊ वारजूरकर, प्रज्ञाताई राजुरवाडे समतादूत बार्टी पुणे,यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी चिमूरचे पोलिस निरीक्षक योगेश घ्यारे, नर्मदा रामटेके,किशोर अंबादे, पत्रकार प्रतिनिधी विकास खोब्रागडे, पोलिस पाटील महेंद्र डेकाटे,एकनाथ गोंगले आदी मान्यवर मंडळी उपस्थिती होती.

महास्थविर पुज्य भदंत शिलानंद,महास्थविर पुज्य भदंत ज्ञानज्योती व पुज्य भिख्खू संघ यांच्या द्वारे शिलग्रहणाबाबत धम्म वाणी प्रसारीत केली.पुज्य भदंत यश, (महामेवा महाविहार श्रीलंका), पुज्य भदंत धम्मचेत्ती संघारामगिरी, ता. वरोरा, जि.चंद्रपूर,भदंत सोण(सोणी टेकडी वडसा), भिख्खू सोनुत्तर,भिख्खू धम्मवंश, भिख्खूनी इंदमुनी(उरवेला मेडिटेशन सेंटर बुद्धगया) यांनी धम्मदेसना दिली. सायंकाळी प्रसिद्ध कवी व गीतकार ,गायक मनोजराजा गोसावी यांचा गायणाचा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक जनर्धन ढेकाटे यांनी केले.

संचालन बालकदास पाटील आभार साहिल खोब्रागडे यांनी मानले.स्नेह भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली.
यशस्वीतेसाठी कवडुजी पाटील अध्यक्ष राजहंस डेकाटे, उपाध्यक्ष मेघराज खोब्रागड़े,सचिव प्रफुल रामटेके, जनार्धन डेकाटे, प्रणय पाटील सूरज रामटेके, सुमेध डेकाटे, सौरव रामटेके, अनुराग गोंगले, भगवान रामटेके, अंबादास पाटील, धम्मदीप रामटेके,गौतम गेडाम उद्धव डेकाटे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here