भरधाव वेगाने येणाऱ्या मोपेड ने दिली युवकाला जोरदार धडक, युवक गंभीर जखमी

0
172

भरधाव वेगाने येणाऱ्या मोपेड ने दिली युवकाला जोरदार धडक, युवक गंभीर जखमी

बल्लारपूर, ता. प्र. रोहन कळसकर : भरधाव वेगाने मोपेड ची धडक बसून एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना २६ जानेवारी रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार रमाबाई चौक, विद्या नगर येथील युवक संकेत धीरज चांदेकर हा पायदळ रस्त्याने जात असताना समोरून मुदस्सिर शेख रा. महाराणा प्रताप वार्ड हा मोपेड क्रमांक एमएच ३४ टी २३८९ ने भरधाव वेगाने येत संकेत यास धडक दिली. त्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याला चंद्रपूर वैद्यकिय महाविद्यालय येथे अतीदक्षता विभागात भरती केले आहे.

तसेच मोपेड चालक मुदस्सिर शेख याच्या पायाला व डोक्याला मार लागला आहे. पोलिसांनी मोपेड चालक मुदस्सिर अब्दुल वहाब शेख याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here