घुग्घुस येथील यंग चांदा बिग्रेडच्या महिलांतर्फे राजमाता जिजाऊ यांची जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

0
200

घुग्घुस येथील यंग चांदा बिग्रेडच्या महिलांतर्फे राजमाता जिजाऊ यांची जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

आदर्श मुलगा घडवायचा असेल तर जिजाऊ मातेसारखे बना – उषा आगदारी

घुग्घुस येथील यंग चांदा बिग्रेडच्या महिल्यांनी दि.१२ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी यंग चांदा बिग्रेडच्या कार्यालयात यंग चांदा ब्रिगेडचे व्यवस्थापक व आ.किशोर जोरगेवार याच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी यंग चांदा बिग्रेडचे महिलांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बहुजन आघाडी व यंग चांदा बिग्रेड महिला शहर अध्यक्षा सौ.उषाताई गौतम आगदारी म्हणाले की,राजमाता जिजाऊ यांच्या विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले.१९ फेब्रुवारी १६३० रोजी त्यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.त्या शिवरायांना लहानांपासूनच तलवारबाजी, विद्या कौशल्य,गनिमी कावा,घोड्यावर बसणे,दांडपट्टा फिरवणे,भालाफेक, कुस्ती खेळणे हे युद्ध कौशल्य त्यांना शिकवायच्या.राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी सत्यात उतरवले.

स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊ मातेच्या फार मोठा हातभार आहे.एक आदर्श मुलगा घडवायचा असेल तर आजच्या प्रत्येक आईनं राजमाता जिजाऊंसारखे आचरण अंगिकारायला हवे.

यावेळी यंग चांदा बिग्रेड कामगार संघटिका वनिता निहाल,कुणबी समाज अध्यक्षा संध्या जगताप,भारती सौदारी,विना गुच्छाईत, सवीता आरले,शिल्पा सोडुले, सुप्रिया आगदारी, अमिता टिपले,शिल्पा आगदारी, किरण पाझारे,माया माडोंकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here