घुग्घुस येथील पंचशील बौद्ध विहारात राजमाता जिजाऊ जयंती साजरी

0
177

घुग्घुस येथील पंचशील बौद्ध विहारात राजमाता जिजाऊ जयंती साजरी

घुग्घुस – येथील भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस, समता सैनिक दल, यशोधरा महिला मंडळ चा अनुषंगाने पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे आई राजमाता जिजाऊ यांची ४२६ वी जयंती साजरी करण्यात आली.
राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुध्द वंदना पंचशील घेऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळेस यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हनाले की,
राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न होते की, आपल्या राज्यातील लोकांसाठी स्वराज्य निर्माण करण्याचा होता. त्याच उद्देशाने त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना माता जिजाऊ कडुन त्याच प्रमाणे शिकवण दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य घडविला.
असेच आपण आपल्या मुलांना मुलींना समाजातील चळवळ शिकवून एक विचारवंत समाज घडविला पाहिजे.
अशीच शिकवण आपण आपल्या मुलांना मुलींना दिली पाहिजे.आणि एकीने राहुन. समाजाची चळवळ उभी केली पाहिजे. आणि ते फक्त भारतीय बौद्ध महासभा च्या अंतर्गत होऊ शकते. आणि ते कार्य आदरणीय महाउपासिका आई साहेब मीराताई आंबेडकर,आदरणीय भिमराव आंबेडकर साहेब करीत आहे. त्यांच्या कार्याला सुध्दा आपल्या आधार आपण दिला पाहिजे आणि हे कार्य भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस चा वतीने घुग्घुस मध्ये होत आहे. तरी आपण सर्व बांधवानी भारतीय बौद्ध महासभेचा भाग झाल व्हावा.
असे मनोगत यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर यांनी व्यक्त केले.
यावेळेस भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे समता सैनिक दल अध्यक्षा अश्विनीताई सातपुते, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे यशोधरा महिला मंडळ सचिव स्मिताताई कांबळे, यशोधरा महिला कोषाध्यक्ष रमाबाई सातारडे, सल्लागार भाग्यश्रीताई भगत,रिया कांबळे,विजय कवाडे,शोभाबाई पाईकराव,यशोधरा मस्के, मीनाताई गुडदे,यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here