अस्पृश्यता निर्मूलन आणि स्त्रीमुक्ती हेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे ध्येय – किरण बोढे

0
236

अस्पृश्यता निर्मूलन आणि स्त्रीमुक्ती हेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे ध्येय – किरण बोढे

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

घुग्घुस शहरातील नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या, अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीमुक्ती, आणि दलित स्त्रियांना शिक्षित करणे हेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे ध्येय होते.
भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होण्याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. देशातील महिलांना शिक्षणासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. सावित्रीबाई फुले यांचे महत्वाचे कार्य १ जानेवारी १८४८ रोजी सावित्रीबाई फुले यांनी पुणे शहरातील भेडीवाडी येथे मुलींसाठी शाळा उघडली. ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रात त्यांचा जन्म झाला. ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्म दिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी महिलांचे अधिकार सुधारण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाई फुले यांना स्त्रीवादाची जननी मानले जाते.

यावेळी प्रयास सखी मंच घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे, भाजपच्या नितु चौधरी,सुचिता लुटे,अमीना बेगम, पुष्पा रामटेके, दुर्गा कंटे,अनिशा मुसळे, शीतल सोनटक्के,निशा राजूरकर, छाया मंगाम,आरती बिहार, वैजनती मोहती, सुनीता महाकुलकर, अश्विनी श्रीनिवास, प्रीती प्रजापती व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here