ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे आदिवासी समाज बांधवांना शीतपेय वाटप

0
278

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे आदिवासी समाज बांधवांना शीतपेय वाटप

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे बुधवार, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत सहभागी आदिवासी समाज बांधवांना शीतपेय वाटप करण्यात आले.

घुग्घुस येथील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
अमराई वार्ड, गांधी चौक, जुना बसस्थानक, तहसीलदार कार्यालय, पोलिस ठाणे चौक मार्गे मार्गक्रमण करीत मिरवणुकीचे समापन करण्यात आले.

मिरवणुकीत मोठया संख्येत आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते.

यावेळी माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्या सुचिता लुटे, वैशाली ढवस, शरद गेडाम, विवेक तिवारी, सचिन कोंडावार, विनोद जंजर्ला, सिनू आडे, कोमल ठाकरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here