घुग्घुस नगरपरिषदेच्या कामगारांचे वेळेवर दर महिण्यात वेतन द्या – राजकुमार वर्मा

0
343

घुग्घुस नगरपरिषदेच्या कामगारांचे वेळेवर दर महिण्यात वेतन द्या – राजकुमार वर्मा

घुग्घुस येथील नगर परिषद कामगाराचे वेळेवर दर महिण्यात वेतन देण्यात यावे अशी मागणी माजी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष चंद्रपूर प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेते राजकूमार वर्मा यांनी घुग्घुस नगरपरिषदेला निवेदनातून केली आहे.
गेल्या महिण्यात वेतनासाठी कामगाराने कामबंद आंदोलन केले होते,नगर परिषद कार्यालयात जवळपास अंदाजे ५० च्या वर कामगार काम करत आहेत मागील दोन ते तीन महिन्यापासून नगरपरिषद कामगाराचे वेतन देण्यात आले नाही,त्यामुळे कामगारांची उपासमारीचे वेळ आली.संतप्त झालेल्या कामगारांनी ठिय्या मांडून काम बंद आंदोलन करण्यात आले होते.अशी समस्या लक्षात घेऊन नगरपरिषद कामगारांना नियमित दर महिन्याला वेतन देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेस नेते राजकुमार वर्मा,माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश ऊईके,शेखर तंगल्लापेल्ली, विक्रम गोगला, सागर कलगूर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here