तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम न करता कांबळे परिवारांनी दिले दहा हजार रुपये दान…

0
1855

तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम न करता कांबळे परिवारांनी दिले दहा हजार रुपये दान…

घुग्घुस आज दि. 07/06 /2023 बुधवार रोज ला वच्छलाबाई शंकरराव कांबळे राहणार पंचशिल वार्ड येथील रहिवासी यांच्या ताई दिगवंत विमलबाई शंकरराव कांबळे तिसर्‍या दिवसाचा कार्यक्रम नकरता वच्छलाबाई शंकरराव कांबळे अनिताताई परेशराम मेश्राम यांनी भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने सुरू असलेले नवनिर्मित विहार बांधकामास दहा हजार रुपये दान दिले.

वच्छलाबाई शंकरराव कांबळे यांनी भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, हेमंत आनंदराव पाझारे, चंद्रगुप्त घागरगुंडे यांनी आखलेली संकल्पना की आपण वाढदिवस, तिसरा दिवस, लग्नाचा वाढदिवस, व अनेक लहान मोठे कार्यक्रम करुन आपण खुप मोठ्या प्रमाणात व्यर्थ पैसा खर्च करतो आणी त्यामधून साध्य काहीच होत नाही.

म्हणून आपण हा पैसा खर्च नकरता समाजाला दान दिला तर त्या दानातील पैसांचा योग्य वापर करून समाजाची चळवळ उभी होईल. या दुष्टीकोणातुन ही संकल्पना आखली होती तर आता हा संकल्पनेला हळूहळू चाल मिळत असुन आज वच्छलाबाई शंकरराव कांबळे अनिताताई परेशराम मेश्राम यांनी तिसऱ्या दिवस साजरा नकरता दहा हजार रुपये दान दिले.

अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी वच्छलाबाई शंकरराव कांबळे अनिताताई परेशराम मेश्राम यांना या संकल्पनेला आपले योगदान दिले. त्याबाबत त्यांना धन्यवाद दिले. आणि ही संकल्पना सर्वाच्या अंगी यावी यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत राहिल. जास्तीत जास्त लोकांनी या संकल्पनेमध्ये भाग घ्यावा असे सुध्दा सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी आव्हान केले.

यावेळेस भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष, सुरेश मल्हारी पाईकराव, विहार बांधकाम कोषाध्यक्ष, हेमंत आनंदराव पाझारे, कार्याध्यक्ष, चंद्रगुप्त घागरगुंडे, महासचिव, रमाबाई सातारडे, कोषाध्यक्ष, वैशालीताई निखाडे, संघटक, पुनमताई कांबळे, पिंकीताई तामगाडगे, सल्लागार, संभाजी पाटील, जयंत निखाडे व समस्त कांबळे परिवार उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here