कर्नाटकात झालेल्या निवडणूकीतील कॉंग्रेसच्या दणदणीत विजयाबद्दल माजी खासदार मा. श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात विदर्भ किसान मजदुर कॉग्रेस जि. चंद्रपूर च्या वतीने गांधी चौक येथे आनंदोत्सव जल्लोषात साजरा

0
383

कर्नाटकात झालेल्या निवडणूकीतील कॉंग्रेसच्या दणदणीत विजयाबद्दल माजी खासदार मा. श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात विदर्भ किसान मजदुर कॉग्रेस जि. चंद्रपूर च्या वतीने गांधी चौक येथे आनंदोत्सव जल्लोषात साजरा

चंद्रपूर, दिनांक 13 मे 2023
कर्नाटक विधानसभा निवडणूकीतील एकहाती दणदणीत ऐतिहासिक विजयाबद्दल कर्नाटकातील सर्व जनतेचे व कॉग्रेसच्या नेत्यांचे कार्यकत्यांचे माजी खासदार मा. श्री नरेशबाबू पुगलिया यांनी अभिनंदन केले. व कर्नाटक कॉंग्रेसचा विजय हा देशाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. हा विजय लोकशाहीचा व कर्नाटक जनतेचा विजय आहे तसेच भाईचारा, विकास आणि समृध्दीच्या बाजूने कर्नाटकाच्या जनतेने कौल दिला आहे.

माजी खासदार मा. श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व युवा नेते राहुलबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाळा मालार्पण करून जनतेला मिठाई वाटप करून फटाक्यांच्या अतिषबाजीत ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसचे ग्रामिण अध्यक्ष गजाननराव गांवडे, जिल्हा महासचिव अँड. अविनाश ठावरी, शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र बेले, जिल्हा महासचिव अशोक नागापूरे, इंटक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पोडे, अँड. विजय मोगरे, जिल्हा महासचिव प्रमोद चिंतावार, माजी नगरसेवक श्रीनिवास पारनंदी, विनोद पिपळशेंडे, महेंद्र जयस्वाल, दुर्गेश चौबे, राजु लहामगे, रतन शिलावार, सुधाकरसिंह गौर, पृथ्वी जंगम, गजानन दिवसे, सुरेश बोडणे, असलमभाई, विजय बलकी, क्रिष्णा यादव, राजेंद्र शुक्ला, सुनिल बकाली, राजकुमार गोरगाटे, धिरज सिंग, अकरम शेख, सुभाष शर्मा, अजय महाडोळे मधुअन्ना, रमेश वलपुरा, संजय गुपलोत, बदरूधिंण इसमाईल खान, अभिजित शेंडे, सुरेश ढोके, प्रशांत घाटे, अजय शाह, विनायक नगराळे, व शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here