संवैधानिक हक्कासाठी- ओबीसींचा चंद्रपुरात येत्या २६ नोंव्हेबरला भव्य मोर्चा !

0
415

संवैधानिक हक्कासाठी- ओबीसींचा चंद्रपुरात येत्या २६ नोंव्हेबरला भव्य मोर्चा !
जिल्हास्तरीय ओबीसी कार्यकर्ता बैठकीत झाला निर्णय !

किरण घाटे

चंद्रपूर:- ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसींना उच्च शिक्षण, सरकारी नोकरी 27% दिलेल्या आरक्षणा नुसार पूर्ण पदे भरण्यात यावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना प्रमोशन मध्ये 27% आरक्षण देण्यात यावे, ओबीसी विद्यार्थ्यांना एससी, एसटी विद्यार्थ्यां प्रमाणे 100% स्कॉलरशिप देण्यात यावी, नॉन क्रिमीलेअर ची असंवैधानिक अट रद्ध करण्यात यावी, खाजगी उद्याेगामध्ये आरक्षण धोरणाचा अंमल करावा, उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पदे न्यायिक आयोगाद्वारे परीक्षा घेऊन भरण्यात यावी, ओबीसी शेतकऱ्यांना एससी, एसटी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कृषी विषयक सवलती देण्यात याव्या आदि मागण्यांसाठी येत्या 26 नोव्हेंबर ला संविधान दिनी चंद्रपुरात एका विशाल मोर्चाचे आयोजन करण्याचे पार पडलेल्या बैठकित सर्वानुमते आज निश्चित करण्यात आले बैठकीला ब्रह्मपुरी, मूल, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर तालुका, बल्लारपूर तालुका व चंद्रपूर शहरातील ओबीसी कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बळीराज धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न बैठकीला डॉ .अभिलाषा गावतुरे, अँड. फरहाद बेग व धोटे यांनी बैठकीला मार्गदर्शन केले .सदरहु मोर्चाचे आयोजनासाठी सर्वांनी सहकार्य करण्यांचे आवाहन या वेळी करण्यांत आले
याच बैठकीत आगामी काळात प्रत्येक तालुका स्तरांवर बैठकीचे नियोजन करण्यात आले.
बैठकीला हिराचंद बोरकुटे, प्रा. माधव गुरनुले, माजी नगर सेवक बंडूभाऊ हजारें ,भोई समाज संघाचे जिल्हा अध्यक्ष, सत्यशोधक समाजाचे अँड. प्रशांत सोनुले, पिंजरा समाजाचे नजीर गुलाब कुरेशी, गुरूदास चौधरी, मंगेश पोटवार, विनोद कामडे मूल, जगदीश पिलारे, राजेश माटे, नरेंद्र वासनिक ब्रम्हपुरी, पांडुरंग टोंगे, कवडूजी मते भद्रावती, मोरेश्वर पाटील सूरकर, सुनील फलके गोंडपिपरी, बंडू डाखरे वरोरा, न्हावी समाज जिल्हा अध्यक्ष दिनेश एकवणकर, हरिदास गौरकार, प्रभाकर गेडाम कोरपना, इरफान शेख, दीपक काटकोजवार, सुधाकर टिकले, तेली समाजाचे इंजि .सूर्यभान झाडे, एम रेहान अहमद, संभाजी ब्रिगेड चे चंद्रकांत वैद्य, इंजि. एल. व्ही .घागी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष वनिताताई आसुटकर, जयश्री झाडे, सुरेखाताई निखाडे, विना पेटकर, छाया सोनुले, पूजा पेटकुले, प्रा. सुनील वडस्कर, सुरज मते, प्रकाश चालूरकर, वेकोली एससी एसटी ओबीसी कॉउंसिल चे भास्कर सपाट, विस्वास बनकर, योगेश आपटे, रामभाऊ इंगोले, अशोक झुरमुरे, प्रतीक भगत, भोलाराम सोनुले, व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here