उषाताई आगदारी यांच्या त्वरित नाली बांधकाम करण्याच्या मागणीला यश…

0
353

उषाताई आगदारी यांच्या त्वरित नाली बांधकाम करण्याच्या मागणीला यश…

घुग्घुस येथील यंग चांदा बिग्रेड व बहुजन महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ. उषाताई गौतम आगदारी मागील काही महिन्यांपूर्वी यंग चांदा बिग्रेड संस्थापक व आ. किशोर जोरगेवार यांच्या आदेशानुसार त्यांनी घुग्घुस नगरपरिषदेला प्रभाग क्र. १० येथील नालीचे त्वरित बांधकाम करण्यात यावे अशी निवेदनातून मागणी केली होती. वारंवार पाठपुरावा व नागरिकांचा संपर्कात राहून नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधून लवकरात लवकर बंदिस्त नालीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती.
आता नगरपरिषद प्रशासनाकडून काम सुरू झाले आहे. यावरून त्या परिसरातील नागरिकांत चर्चेतून बोलले जात आहे की, यंग चांदा बिग्रेड व बहुजन समाज आघाडी महिला शहर अध्यक्षा सौ. उषाताई गौतम आगदारी यांच्या पाठपुराव्यने यश आले. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीचे नागरिकांकडून मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here