कोरोना जनजागृती काव्यधारा – १०
कवी – गोपाल शिरपूरकर, चंद्रपूर

कविता : समाजभान
जाणतेपणीही असे का करावे
असूनही डोके, गहाण ठरावे…
जाण तमाची असे जरी नित्य
विश्वास मनीचा ठरावा स्तुत्य
गळ्याशी येईस्तो धाडस कां करावे…
धाडस असावे मान्य जगताला
जीवनाचे मोल विचारा स्वतःला
मर्त्य जरी देह, अकाली का पुरावे…
नसे एकटा तू समाजसंग
राव असो की रंक भणंग
जपणे सकलांना का गैरलागू ठरावे…
अति आत्मविश्वास गाढेल सकला
रोगांपुढे या वैद्य ही थकला
हेका तुझा का कारण ठरावे…
कवी : गोपाल शिरपूरकर, चंद्रपूर
संपर्क – ७९७२७१५९०४
(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)
•••••