वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी, सिदेवाही तालुक्यातील वासेरा येथील घटना

0
523

वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी, सिदेवाही तालुक्यातील वासेरा येथील घटना

विकास खोब्रागडे

सिंदेवाही (१८ ऑक्टो.) । सिंदेवाही तालुक्यातील शिवणी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या वासेरा येथील गुराखी वासेरा बिट ५७० जंगल परिसरात गुरे चराईसाठी गेला असता त्याचेवर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली जखमी गुऱ्याचे नाव तेजराम किसन नागापुरे (६०) रा .वासेरा असे आहे.शिवणी वनपरिपरिक्षेत्रात मोठया प्रमाणात वन्य हिस्त्र प्राण्याचा वावर असून वाघ , बिबट या हिंसक प्राण्याचे नियमित नागरिकाना दर्शन घडत असतात. तसेच दरवर्षी वाघ हल्ल्याच्या घटना नियमीत घडत असतात. वाघ हल्ल्यात ठार झाल्याच्याही घटना मागील वर्षात घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात वाघाची दहशत कायम असते. रविवार दुपारच्या सुमारास वासेरा गाव परिसरातील जंगल परिसरात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून तेजराम नागापूरे यास जखमी केल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहीती वनविभागाला कळताच घटना स्थळ गाठून जखमीला सिंदेवाही प्राथमिक स्वास्थ केंद्रात दाखल करून प्रथमोपचारानंतर चंद्रपूर रूग्णालयात हलविण्यात आले आहे.दिवसेदिवस वाघांचा वावर गाव परिसरात आढळून येत असल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण होत असते. वाघांचे हल्ले टाळण्यासाठी वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here