भीम आर्मी संघटनेच्या प्रयत्नाने अपंग युवकाला न्याय

0
572

भीम आर्मी संघटनेच्या प्रयत्नाने अपंग युवकाला न्याय

● 1 लाख 50 हजार रुपये निधी प्राप्त
● दिव्यांग स्वयंरोजगार बीजभांडवल योजनेचे प्रकरण

 

 

कोठारी/राज जुनघरे

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील रहिवासी अपंग युवक राहुल नंदकिशोर मुरकुटे हा जन्मजात डोळ्याने 40%अंधत्व आहे. त्यांने स्वरोजगारासाठी फळविक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरवून चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत अपंगांना स्वरोगारासाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत 5/10/2021 रोजी अर्ज दाखल केले होते सदरचा अर्जावर रीतसर प्रक्रिया करून कर्ज मंजूर करून संबंधित कर्जाचे प्रस्थाव बँक ऑफ इंडिया शाखा कोठारी याना पाठविण्यात आले.

 

 

बँक मध्ये युवकाने F/D स्वरूपात 20,000 वीस हजार रुपये भरले. मात्र नियमाप्रमाणे समाज कल्याण, जिल्हा परिषद चंद्रपूर कडून जो पर्यंत अनुदानाचा धनादेश बँकेला प्राप्त होणार नाही. तो पर्यंत कर्जाची पूर्ण रक्कम व्यवसायासाठी बँक द्यायला तयार नव्हती.

 

 

अशातच अपंग वेक्तीला कर्जाचा एकही रुपया हातामध्ये न भेटता कर्ज मंजूर दिनांक पासून मासिक व्याज भरावी लागत होती. त्यातच 20 हजार रुपये देखील गुंतले होते आणि निराधार चे मासिक प्राप्त होणारे अनुदान देखील व्याजापोटी कटत होते त्यामुळे अपंग युवक हतबल व निराश होऊन सदरचा मुद्दा भीम आर्मी संघटनेसमोर मांडला.

 

 

त्यानंतर संघटनेने समाज कल्याण अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आ.सुधीर मुनगंटीवार, खा.बाळू धानोरकर । मंत्री विजय वडदेतीवार यांच्याकडे निवेदने देऊन अनुदान देण्याची मागणी केली.

 

 

तेव्हा समाज कल्याण जिल्हा परिषद चंद्रपूर नि आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांच्याकडे अनुदानासाठी पत्र लिहिले तरीदेखील निधी प्राप्त होत नव्हता अंततः भीम आर्मी संघटना आक्रमक पवित्रा घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, धनंजय मुंडे मंत्री सामाजिक न्याय व विशेष सह्यय विभाग म.रा., डॉ. विश्वजित कदम राज्यमंत्री सामाजिक न्याय व विशेष सह्यय विभाग तसेच आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांना उच्चस्थरिय निवेदन देऊन अपंग युवकाला कर्जाचे अनुदान त्वरित देण्याची मागणी केली.

 

 

अखेर शासनाने मागणी मान्य करून अपंग युवक राहुल मुरकुटे सोबतच जिल्ह्यातील सदर योजनेखालील उर्वरित अपंगाचा निधी मंजूर करून जिल्ह्यातील अपंगांना निधी प्राप्त करुन देत दिलासा दिला आहे.

 

 

भीम आर्मीच्या सतत च्या पाठपुराव्या ने अखेर शासनाला नमते होऊन अपंग युवकाला त्यासोबत जिल्हातील अनेक अपंग युवकाला न्याय मिळाला. सदर न्यायच्या लढ्यात भीम आर्मी शाखा कोठारी तसेच बल्लारपूर तालुका व जिल्ह्यातील पदाधिकारी यांचे योगदान होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here