ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मन की बात कार्यक्रम

0
433

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मन की बात कार्यक्रम

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रविवार, २६ फेब्रुवारीला सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, शहरातील प्रत्येक बुथवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचत आहे. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला उत्तम प्रतिसाद दिला आहे.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे विनोद जंजर्ला, स्वप्नील झाडे, शरद गेडाम, गणेश बोबडे, श्रीकांत बहादूर, राजू चौधरी, मनोज मल्लारप, नरेश संकनपेल्ली, अभिलाष, महाकाली, रोहित गोरे, वमशी काम्पेल्ली, पिंटू कांबळे, नागेश मातंगी, प्रतीक पिंपळकर, महेंद्र जेनेकर, नेहा कुम्मरवार, स्वाती गंगाधरे, खुशबू मेश्राम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here