भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार 

125

भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार

दिनांक 18 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्यात वेळोवेळी युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडत जनसेवेचा कीर्तिमान स्थापन करणारे युवा नेतृत्व म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली असे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.आशिषजी देवतळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बल्लारपूर येथील श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात कुशल संघटक भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.देवरावजी भोंगळे यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी राजुरा विधानसभेचे माजी आमदार श्री.सुदर्शनजी निमकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिषजी देवतळे, भाजपा जिल्हा महामंत्री नामदेवजी डाहुले, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेकजी बोढे तसेच भाजयुमो जिल्हा महामंत्री मिथलेश पांडे, महेश देवकते,इमरान खान, जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, आशिष ताजने,मोहित डंगोरे, संदीप पोडे, आकाश वानखेडे, राहुल सुर्यवंशी, जिल्हा सचिव राहुल बिसेन, तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, सौरभ मेनकुदळे, विस्मय बहादे, वैभव पिंपळशेंडे,अमोल नगराळे,वैभव विशाल शर्मा, तेजस अलवलवार, राजू निषाद, योगेंद्र केवट,धीरज पाला,आदित्य शिंगाडे, तोशिब शेख, मौला निषाद, तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

advt