भारतीय बौद्ध महासभा राजुरा तर्फे विविध ठिकाणी माता रमाई जयंती साजरी

0
578

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तर्फे विविध ठिकाणी माता रमाई जयंती साजरी

राजुरा, 8 फेब्रु. : त्यागमूर्ती माता रमाई यांची 125 वी जयंती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा राजुरा तर्फे तालुक्यात विविध ठिकाणी काल साजरी करण्यात आली.

धोपटाळा टाऊनशिप येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय शिक्षिका भारतीय बौद्ध महासभा बल्लारपूर च्या समताताई लभाने तसेच राजुरा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष धरमु नगराळे होते. बामनवाडा येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक ग्रामशाखेचे अध्यक्ष तर भेदोडा येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा शहर विभागाचे सरचिटणीस होते. राजुरा येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार विभागाचे सचिव भीमराव खोब्रागडे तर सोमनाथपुर वॉर्ड येथील अभिवादन कार्यक्रमाचे अयोजन वैशाली महिला मंडळ व भारतीय बौद्ध महासभा यांच्या तर्फे करण्यात आले.

सदर ठिकाणी माता रमाई यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमास पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित उपसकांनी बुद्ध वंदना ग्रहण केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विविध ठिकाणी आयोजकांनी जयंती अभिवादन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here