राजुरा येथील डॉक्टर बबीता कांबळे यांच्या वाढदिवसानीमीत्य राजुरा नेफडो कडून व्रूक्षारोपन

0
433

राजुरा येथील डॉक्टर बबीता कांबळे यांच्या वाढदिवसानीमीत्य राजुरा नेफडो कडून व्रूक्षारोपन.

राजुरा 14 ऑक्टोबर

राजुरा येथील डॉक्टर बबीता कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या तालुका संघटक सूनैना तांबेकर यांच्या पुढाकारातुन आसीफाबाद रोड रेल्वे क्रॉसिन्ग जवळ व्रुक्षारोपन करण्यात आले. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव बादल बेले, संगीता मडावि , शुभांगी गेडाम ,सूनैना तांबेकर ,नेफडो चे राजुरा शहर अध्यक्ष संदीप आदे आदींची प्रामुख्याने उपस्थिति होती.
कोरोणा या जागतिक महामारीच्या कठिन प्रसंगी महत्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉक्टर्स यांना तर सध्या कुठलाही आनंदी प्रसंग जणू साजरा करता येत नाही. तेवढा वेळही त्यांच्याकडे नाही. धावपळ ,दगदग आणि प्रचंड तणाव यामुळे स्वताचा जीव धोक्यात घालून डॉक्टर्सना वैद्यकीय सेवा द्यावी लागत आहे.अश्यातच राजुरा येथील डॉ. कांबळे यांच्या वाढदिवसाचे अवचीत्य साधत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या तालुका संघटक सूनैना तांबेकर यांनी पुढाकार घेत व्रूक्षारोपन करून त्यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली. कोरोणा संकट काळात सर्वात महत्वपूर्ण भूमिका ही ऑक्सिजनची आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे नेफडो राजुरा टीम ने जास्तीत जास्त व्रुक्षारोपने करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेतलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here