शिक्षणा सोबतच जीवनात शिलाचे आचरण फार महत्वाचे -प्रिती रामटेके
चंद्रपूर । किरण घाटे

शिक्षणा साेबतच डाँ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात असलेले शिलाचे महत्व व आचरण फार महत्वाचे असल्याचे विस्तार अधिकारी प्रिती रामटेके यांनी विद्यार्थ्यांना सांगत जीवनात यशस्वि हाेण्याचा माेलाचा सल्ला मार्गदर्शन करतांना त्यांनी दिला.त्या प्रबाेधन विचार मंच आणि युवा मंच व्दारे आयोजित (गरीब व हाेतकरु विद्यार्थ्यांना) शालेय साहित्य वाटप या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाेलत हाेत्या .काेराेना संकटात शाळा व काँलेज बंद जरी असले तरी उपरोक्त संस्थेंचा ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना (आवश्यक) शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम सातत्याने सुरु आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणुन राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे नुकताच हा एक (शालेय साहित्य वाटप) कार्यक्रम पार पडला. याच कार्यक्रमाचे अनुषंगाने प्रबाेधनी विचार युवा मंचचे संयोजक विनोद साेनटक्के, विपुल रंगारी , समर्थ वेल्हेकर ,यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अल्पश्या भाषणांतुन माेलाचे मार्गदर्शन केले .सदरहु शालेय साहित्य सामुग्री वाटप कार्यक्रमाला धनंजय पिंपळे व राहुल जवादे यांचे विशेष सहकार्य लाभले.