“त्या” पाेलिस हवालदारांना उपनिरीक्षक पदाचे आदेश द्या!

0
727

“त्या” पाेलिस हवालदारांना उपनिरीक्षक पदाचे आदेश द्या!
चंद्रपूर जिल्हा पाेलिस बाँईज असाेशिएशनची मागणी

चंद्रपूर, किरण घाटे : पाेलिस उपनिरीक्षक अहर्ता परीक्षेतील उरलेल्या अंदाजे आठ ते नव हजार पाेलिस हवालदारांची जेष्ठता यादी न बघता त्यांना सरसरकट पाेलिस उपनिरीक्षक पदाचे आदेश देण्यांत यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य पाेलिस बाँईज असाेशिएशनचे अध्यक्ष प्रमाेद वाघमारे यांचे सुचनेच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा पाेलिस बाँईज असाेशिएशनचे जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे, जिल्हा उपाध्यक्ष साहिल मडावी, जिल्हा संघटक सद्दाम अन्सारी, शहराध्यक्ष देविदास बोबडे, शहर उपाध्यक्ष बशीरभाई अन्सारी, महिला आघाडी सहसंघटिका रिता शिंदे यांनी आज मंगळवार दि. ४ मे ला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे मार्फत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एका निवेदनातुन केली आहे. दरम्यान सन २०१३मध्ये पाेलिस खात्या अंतर्गत पाेलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा झाली असल्याचे सादर केलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here