‘मुस्लिम समाज आरक्षण’ संदर्भात खा. बाळू धानाेरकर राष्ट्रपतींची भेट घेणार!

0
402

‘मुस्लिम समाज आरक्षण’ संदर्भात खा. बाळू धानाेरकर राष्ट्रपतींची भेट घेणार!

चंद्रपूर । किरण घाटे

राष्ट्रीय आयोगाची स्थापना करून न्या .रंगनाथ मिश्रा न्या. सच्चर आयोगाचा अहवाल सन २००४मध्ये प्राप्त झाला सन २००६ मध्ये प्रधानमंत्री १५ कलमी कार्यक्रम जाहीर झाला मात्र त्याची प्रभावीपणे अमल बजावणी झाली नसल्याचे दिसुन येते. झालेल्या अमल बजावणी मध्ये काही उणीवा असल्याने समाज सर्वच क्षेत्रात मागे पडला आहे .आरक्षणाची मागणी सातत्याने केल्या जात असुन न्यायालयाने देखिल सकारात्मकरित्या (शैक्षणिकद्रूष्टीकाेणातुन) आरक्षणाचे मत व्यक्त केले आहे. मुस्लीम आरक्षण निर्णायक आंदोलन समितीचे संपुर्ण राज्यभर (आरक्षण )आंदोलन सुरु असुन चन्द्रपुर जिल्ह्याचे विद्यमान खासदार बाळा धानोरकर यांना समितीच्या वतीने नुकतेच एक मागणीचे लेखी निवेदन सादर केले आहे .या मागणीबाबत आपण पाठ पुरावा करणार असुन त्या अनुषंगाने लवकरच राष्ट्रपती यांची शिष्टमंडळा सह भेट घेणार असल्याचे त्यांनी आंदोलन समितीच्या पदाधिका-यांना एका भेटी दरम्यान सांगितले.

सदरहु मागणी संदर्भात लोकसभेत आरक्षणाचा मुद्दा उचलुन धरु असे आश्वासन देखिल खा.धानाेरकर यांनी या वेळी दिले तदवतचं याच मागणी बाबत आपण स्वता राज्यपाल व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेंट घेवून त्यांचेशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.

याच मागणीसाठी पालकमंत्री व जिल्ह्यातील काही आमदार सतत पाठपुरावा करीत असल्याचे समितीच्या एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. शैक्षणिक आरक्षण, मुस्लीम विद्यार्थ्या साठी निवासी शाळा ,मुस्लिम संरक्षण कायदा अमलात आणावा ,अल्पसंख्याक आवास योजना निर्माण करुन मॉ फातिमा आवास योजना, नामकरण आदि विविध मागणीचे निवेदन खासदार बाळुभाऊ धानोरकर यांना देण्यात आले. यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर उपस्थित होत्या.

खा. धानाेरकर यांना निवेदन सादर करतांना सय्यद आबीद अली ,अॅड. शाकीर मलक, इमरान दोसानी हाजी हारून रमजान अली, मुनाजशेख इ၊बा दुल सिद्दीकी इरफान शेख ,सिम खान, लतीफ खान जावेद सिद्दीकी ,कादर शेख शफी नाजीर कुरैशी ,एजाज भाई . शहेजाद हुसैन ,शाहीन शेख, मलीका नफीसा अंजुम, प्रा. नाहीदा काजी ,कौसर खान शिरीन कुरेशी सह मुस्लिम समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होत्या. असे जास्मिम शेख यांनी एका पत्रकातुन कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here