पत्रकारांनी लेखणीच्या जोरावर समाजात सकारात्मक विचारांची पेरणी करावी – आ. किशोर जोरगेवार

0
360

पत्रकारांनी लेखणीच्या जोरावर समाजात सकारात्मक विचारांची पेरणी करावी – आ. किशोर जोरगेवार

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्या स्तरीय मेळाव्याचे आयोजन

आजची पत्रकारीता योग्य दिशेने चाललीय काय याचे चिंतन करण्याची गरज आहे. पत्रकारांकडे लेखणीची ताकत आहे. त्यांच्या याच लेखनितुन मोठ मोठ्या चळवळी उभ्या राहिल्या आहे. मात्र आता पत्रकारीतेचे बदलते युग सुरु झाले आहे. अशात पत्रकारांनी विश्वनियंता कायम ठेवत त्यांच्याकडे असलेल्या लेखनी या शस्त्राच्या जोरावर समाजात सकारात्मक विचारांची पेरणी करावी असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा स्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार बाळू धानोरकर, पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी, ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष गजानन वाघमारे, चंद्रपुर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सचिव राजेश डांगटे, राज्य सहसचिव अविनाश राठोड, राज्य प्रवक्ता अनंतराव गावंडे, वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक संजय वैरागडे, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापण, महासचिव पुरुषोत्तम चैधरी, कार्याध्यक्ष कुकु सहानी, उपाध्यक्ष अनिल देठे, सचिव विनोद पन्नासे, कोषाध्यक्ष प्रकाश हांडे, मार्गदर्शक धर्मेश नकोसे, सहसचिव प्रभाकर आवारी, धनराज कोवे प्रसिद्धी प्रमुख, सदस्य नवजोत झाडे, अजय गणवीर ,सी.आर.टेंभरे, विक्की गुप्ता, अशोक गुरुवाले, विजय बोरगमवार, महावीर लोहकरे, दुधनाथ चव्हाण, अनिल स्वामी सावली, शंकर चव्हाण जिवती, मुमताज अली, अश्फाक शेख, लक्ष्मीकांत कामतवार, दुर्योधन धोंगडे, जिवनदास गेडाम, सुरेश डांगे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, ग्रामीण भागात काम करणारे पत्रकार पत्रकारीतेचा कणा आहे. त्यांच्या माध्यमातून ग्रामिण भागातील समस्या आमच्या पर्यंत पोहचतात. आता या क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे काळानुसार पत्रकारांनीही बदल करण्याची गरण्याची गरज आहे. सध्या सोशल मिडीया मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे. यात अनेकांना रोजगाराचीही संधी उपलब्ध झाली आहे. मात्र डिजिटल मिडीयात सर्वात आधि बातमी देण्याच्या नादात समाजात निगेटिव्हीटी पसरवु नका, बातमी देतांना त्यातील सतत्या तपासा असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. पत्रकार हा समाजातील प्रमुख घटक आहे. अनेक क्षेत्रात पत्रकारांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. पत्रकार हा समाज आणि आमच्या मधला महत्वाचा दुवा आहे. समाजातील प्रश्न व्यथा त्यांच्या माध्यमातुन आमच्या पर्यंत पोहचल्या पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. बदलत्या काळात पत्रकारांनी अद्यावत राहण्याकरीता पत्रकार संघानी एकत्रीत येत मोठ्या कार्यशाळेचे आयोजन करावे यात शक्य ते सहकार्य आपण करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमात पत्रकारांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामीण भागातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here