प्रलंबित मागण्यांसाठी – नर्सेस संघटनेचे चंद्रपूरात साखळी उपाेषण सुरुच ! आज उपाेषणाचा ६ वा दिवस !

0
542

प्रलंबित मागण्यांसाठी – नर्सेस संघटनेचे चंद्रपूरात साखळी उपाेषण सुरुच ! आज उपाेषणाचा ६ वा दिवस !

🟥⬜🟫चंद्रपूर🟪🟪🟢🟡किरण घाटे🟥🟢प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधून त्या त्वरीत पदरात पडाव्या या साठी गेल्या सहा दिवसांपासून नर्सेस भगिनींचे साखळी उपाेषण सुरु आहे . 🟫🟪⬜🟥🌼🔲🟪🔲♦️चंद्रपूरातील जिल्हा परिषद समाेर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना चंद्रपूर यांचे वतीने हे साखळी उपाेषण सुरु असुन आज (बुधवारला) या उपाेषण मंडपात ज्याेति गेडाम , जया रामटेके , प्रतिभा नगराळे , विमल किर्लेकर ह्या साखळी उपाेषणाला बसल्याचे प्रत्यक्षात दिसून आले आहे .🛑🌀🟩🟥🟡🟢🔲🟥🟪१२व २४वर्षाची कालबध्द पदाेन्नती तसेच १०,२०,३०ची कालबध्द पदाेन्नती मंजूर करण्यांत यावी , एल .एच .व्ही पदावर पदाेन्नती देण्यांत यावी भविष्य निर्वाह निधीची रक्कम एक महिण्यांच्या आत देण्यांत यावी , सेवापुस्तके अद्यावत करण्यांत यावे प्राथमिक आराेग्य केन्द्रातील रिक्त पदे जलद गतीने भरण्यांत यावे अश्या एकुन १५मागण्यां उपराेक्त( नर्सेस) संघटनेच्या आहे.🟡🟢🟨💠🟥♦️🟫🟩🌀सदरहु मागण्यांची त्वरित पुर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यांचा इशारा या संघटनेच्या अध्यक्षा इंदिरा लांडे , प्रतिभा नगराळे , जयंती रामटेके व संघटनेच्या काही पदाधिका-यांनी एका निवेदनातुन दिला आहे .🟥🟨💠🟥🟪🟫🔲⬜♦️काेराेना काळात याच नर्सेस भगिनींनी दिवस रात्र जिवाची बाजी लावून आपली सेवा दिली .शासनाने त्यांना काेविड याेध्दे म्हणून त्यांचा मान सन्मान केला पण आज त्याच नर्सेस भगिनींना आपल्या रास्त व न्याय मागण्यांसाठी मंडप टाकुन साखळी उपाेषण करावे लागत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here