विदर्भ इमारत व इतर बांधकाम कामगार संघातर्फे संघटनात्मक बैठक संपन्न

0
394

विदर्भ इमारत व इतर बांधकाम कामगार संघातर्फे संघटनात्मक बैठक संपन्न

भारतीय मजदूर संघ चंद्रपूर कार्यालयात हनुमान मंदिर तुकुम येथे गणेश देवतळे यांच्या अध्यक्षतेखालील बैठक घेण्यात आले.

विदर्भ इमारत व इतर बांधकाम कामगार संघ जिल्हा चंद्रपूर या कार्यसमीतीची बैठक भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विवेक अल्लेवार उपस्थित झाली.

संघटनात्मक समस्या सोडवण्याचे मार्गदर्शन केले.तसेच विदर्भ इमारत व इतर बांधकाम कामगार संघाचे अध्यक्ष श्री अरविंदजी कोरे यांनी पण संघटन एक जुटीने राहुन व्यवस्थित काम करायचे प्रत्येक तालुक्यात कार्यकरणी तयार करण्याचे असे मार्गदर्शन केले, तसेच जिल्हामंत्री सौ. सरलाताई उगे यांनी मागील कामाचे आढावा वाचुन दाखवला. दिनांक 28 डिसेंबर 2022 ला सर्वांनी महामोर्चाला संयोग दिला सर्वाचे अभिनंदन केले, तसेच इतर बांधकाम कामगार संघ अध्यक्ष श्री गणेश देवतळे यांनी पण , आपल्या संघटन कार्याची जबाबदारी धरुन काम करण्याचे मार्गदर्शन केले.सर्व कार्य समितीचे सर्व पदाधिकारी हजर होते.

यावेळी विदर्भ इमारत बांधकाम कामगार संघ नागपूर सहसचिव परशुराम उगे, चंद्रपूर सदस्य अनिल कातकर, संदीप घोडेकर व इतर सर्व बांधकाम कामगार संघ पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here