यंग चांदा ब्रिगेड घुग्घुसतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

0
516

यंग चांदा ब्रिगेड घुग्घुसतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

घुग्घुस दि.३ जानेवारी २०२३ मंगळवार रोजी मा.आ. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या जनसंपर्क व यंग चांदा ब्रिगेड कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त्य अभिवादन करण्यात आले. बहुजन महिला आघाडी शहराध्यक्षा सौ.उषाताई आगदारी म्हनाले सावित्री बाई फुले यांची जयंती बालिका दिन आणि महिला शिक्षण दिन म्हणून देखील साजरा केला जातो. यानिमित्ताने मुलींना शिक्षण मिळणं किती महत्त्वाचं आहे याची विविध स्तरावर जनजागृती केली जाते.

३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म महाराष्ट्रात सातारा येथील नायगाव मध्ये झाला. कर्मठ समाजाला न जुमानता सावित्रीबाईंनी सुरूवातीला स्वतः शिक्षण घेऊन समाजातील स्त्रिया, मुलींना शिकण्यास प्रवृत्त केले. त्यांच्यासाठी विशेष शाळा सुरू केली. केवळ शिक्षण क्षेत्रामध्येच नव्हे तर समाजातील अनिष्ट रूढी- परंपरांना देखील छेद देत त्यांनी मोकळा श्वास घेण्यास मोलाची कामगिरी बजावली आहे. आज या क्रांतीज्योतीच्या १९२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण,पुष्पहार अर्पण करून अभिवादन करते.

यावेळी बहुजन महिला आघाडी शहराध्यक्षा सौ. उषाताई आगदारी, आदिवासी महिला आघाडी शहराध्यक्षा सौ. उज्वला उईके, म्हातारदेवी संरपच संध्या पाटील, यंग चांदा ब्रिगेड घुग्घुस नेते इमरान खान, मनीषा मेश्राम, वनिता निहाल, कामिनी देशकर, रिना करेकार, स्मिता कांबळे, वंदना नळे,यशोधरा पाझारे,छकुली गेडाम, नंदुभाऊ ठेंगणे, सुनिता कोतपल्लीवार, राजु सुर्यवंशी, भुर्देवी अटेला,सुचित सौदारी, स्वप्नील वाढई, नागेश तुराणकर, जैबर पठाण, नागेश तुराणकर, प्रराग आकूलवार, निलेश भोंगळे व यंग चांदा ब्रिगेड घुग्घुस परिसरातील महीला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here