संघरामगिरी परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करा

0
471

संघरामगिरी परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करा

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सौर कुंपण करा

बहुजन विचार बहू.संस्थेची मागणी

चंद्रपूर

जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात असलेल्या रामदेगी परिसरातील संघरामगिरी तपोवन बुद्ध विहार हे गेल्या ४० वर्षांपासून धम्मचळवळीचे प्रेरणास्रोत म्हणून उदयास आले आहे.अशा या भूमिचा विकास करण्यासाठी या परिसराला पर्यटन स्थळ घोषित करण्याच्या मागणी साठी बहुजन विचार बहुउद्देशीय संस्था खडसंगी ने निवेदनातून शासनस्तरावर मागणी केली आहे.

संघरामगिरी परिसराला पर्यटन क्षेत्र निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून परिणामी या ठिकाणी येणाऱ्या धम्मबांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.मागील काही दिवसांपूर्वी या ठिकाणचे धम्म चळवळीचे केंद्र सोडून जाण्याबाबत प्रप्त प्राप्त झाले असून या मुळे समाजबांधवात संतापाची लाट निर्माण झाली आहे.संघरामगिरी हे देशविदेशातील धम्मगुरु व उपासकांच प्रेरणास्थान असून या भूमीला वंदन करण्यासाठी दरवर्षी धम्मसमारोह आयोजित केला जातो.या समारोहाला लाखो अनुयायांची उपस्थिती असते.

या ठिकाणी वन्यजीव-मानव संघर्ष थांबविण्यासाठी वनविभागाकडे अनेकदा सौर कुंपण उभारण्याची मागणी तसेच विहार परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर करण्यासह या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा मागणीच्या आशयाचे निवेदन लोकप्रतिनिधी व प्रशासनाला करण्यात आले आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अध्यक्ष आशिष गजभिये, सचिव प्रशांत मेश्राम,पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद राऊत, मयूर मेश्राम,धीरज शंभरकर,प्रतीक औतकर,प्रतीक चिंचाळकर,पियुष रामटेके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here