क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्य विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप…

105

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्य विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप…

चंद्रपूर : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विचारज्योत फाऊंडेशन, चंद्रपूर आणि समाज समता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू आणि होतकरू विद्यार्थांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. शालेय साहित्य वाटप हा कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, सिनाळा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर सुरज पी दहागावकर यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक भूमिका स्पष्ट केली. पुढे प्रलय म्हशाखेत्री यांनी उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे संचालन नभ मंडलवार यांनी केले आणि आभार सौ. रेखा केसकर यांनी मानले.

शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाला विचारज्योत फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष सुरज पी. दहागावकर, सचिव मुन्ना तावाडे, समाज समता संघाचे विदर्भ अध्यक्ष इंजी. नरेंद्र डोंगरे, प्रलय म्हशाखेत्री, शुभम जुमडे, सोबतच सिनाळा शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निती रामटेके, प्रफुल दयालवार, रेखा केसकर, अल्का चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीच्या माधुरी मुनघाटे, ग्रामपंचायत सदस्या सौ. आम्रपाली रत्नपारखी आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

advt