रवी किन्नाके यांची गरुडझेप

0
509

रवी किन्नाके यांची गरुडझेप
विषम परिस्थितीवर मात करीत तो झाला उद्योग निरीक्षक काँग्रेस तर्फे सत्कार

घुग्घूस : येथील अमराई वॉर्डात राहणाऱ्या आदिवासी समाजातील होतकरू युवकाने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर दिवसरात्र घेतलेले अथक परिश्रम जिद्द चिकाटी यांच्या माध्यमातून हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या 2022 च्या उद्योग निरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण होऊन सेवेत शामिल होणार आहे. रवी यांची परिस्थिती ही हलाखीचीच होती वडील एसीसी कंपनीत कार्यरत होते.

अमराई सारख्या मागास क्षेत्रात शैक्षणिक वातावरण ही नव्हते
मात्र अश्या सर्व बिकट परिस्थितीवर मात करून त्याने समाजापुढे आदर्श असा पायंडा घातला असून येणाऱ्या पिढीतील युवकांन करीता तो प्रेरणास्थान ठरला त्याच्या यशाचा सन्मान करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी,काँग्रेस नेते सैय्यद अनवर यांनी त्यांच्या राहत्या घरी भेट देऊन लाडूने त्यांचे तोंड गोड करीत पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला.
व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अलीम शेख, रोशन दंतलवार, रोहित डाकूर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here