शोकसंवेदना
शून्यातून विश्व तयार करणाऱ्या आदर्श नेत्यास देश मुकला – आ. किशोर जोरगेवार

हलाकीच्या परिस्थितीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत विद्यार्थी चळवळ ते केंद्रीय मंत्री असा यशस्वी प्रवास करत शून्यातून विश्व तयार करणाऱ्या आदर्श नेत्यास देश मुकला अशी शोकसवेदना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या रामविलास पासवान यांचा केंद्रिय मंत्री पदापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 32 वर्षात त्यांनी 11 निवडणुका लढवल्यात, सहा प्रधानमंत्र्यासह त्यांनी काम केले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर राजकारणात त्यांनी गाठलेले यशस्वी शिखर अनेक नेत्यांना प्रेरीत करणारे आहे. दलितांच्या हक्कासाठी लढा उभारत दलित नेते म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र आज त्यांच्या अचानक जाण्याने राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. असे शोकसंदेशात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.