कायस्वरूपी जागेचा पट्टा देण्याची प्रक्रिया जलद गतीने करण्यात यावी – आ. किशोर जोरगेवार

0
358

कायस्वरूपी जागेचा पट्टा देण्याची प्रक्रिया जलद गतीने करण्यात यावी – आ. किशोर जोरगेवार

मागणीचा पाठपुरावा, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा

चंद्रपूर । नजुलाच्या जागेवर बसलेल्या चंद्रपुरमधील अनेक भागातील नागरिकांकडे घरपट्टे नाही. त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावे यासाठी आमदार किशोर जोरगेवार आग्रही आहेत. त्यांच्या कडून याचा सत्तात्याने पाठपुराव सुरु आहे. दरम्यान त्यांनी मुंबई येथील मंत्रालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली असून चंद्रपूरात नजुलाच्या जागेवर बसलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी अशी आग्रही मागणी केली आहे. सदर मागणीचे पत्रही यावेळी त्यांनी ना. बाळासाहेब थोरात यांना दिले.

चंद्रपूरातील बहुतांश भाग हा नजूलच्या जागेवर बसला आहे असून जवळपास ६० हजार घरे नजूलच्या जागेवर आहे. लाखो रुपयांचे घर असूनही पट्टे नसल्यामूळे येथील नागरिकांना विविध शासकीय योजनेच्या लाभापासून नेहमीच वंचीत राहावे लागत आहे. घरकूल योजनेअंतर्गत अनेकांचे अर्ज स्विकारण्यात आले. मात्र घराला पट्टा नसल्यामूळे नजूल धारकांना या योजनेपासूनही वंचित राहावे लागले, यासह जागेचा पट्टा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आमदार किशोर जोरगेवार यांनी हा विषय चांगलाच रेटून धरला आहे. पहिल्याच अधिवेशनात त्यांनी चंद्रपूरकरांना घटपट्टे देण्यात यावे अशी मागणी करत सदर मागणीकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी महसुल मंत्री यांना उद्देशून चंद्रपूरकरांना घरपट्टे देण्याच्या दिशेने शासनाने त्वरीत निर्देश पारीत करावे अशी मागणी केली होती. त्यानंतर सदर मागणीच्या पुर्तेसाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. दरम्यान त्यांनी मुंबई येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेत या मागणी बाबत चर्चा केली. दरवर्षी अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक संकटामुळे येथील नागरिकांची घरे शातीग्रस्त होतात. मात्र जागेचा पट्टा नसल्याने शासकीय लाभापासून त्यांना वंचित राहावे लागत असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या लक्षात आणून दित असून सदर मागणी बाबत सविस्तर चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here