छटपूजा कार्यक्रमाला आ. किशोर जोरगेवार यांची भेट
चंद्रपूरात विविध ठिकाणी छटपूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा छटपूजेच्या ठिकाणी आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत छटपूजा उत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, पंकज गुप्ता, अशोक गुप्ता, सुर्यप्रकाश पांडे, राकेश गुप्ता, सुनील जैस्वाल, कृष्णा यादव, सुनील सोनकर, सुभेदार यादव, बंटी गुप्ता यांची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही चंद्रपूरात विविध ठिकाणी छटपूजा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर हा औद्योगीक जिल्हा असल्याने कामानिमीत्य येथे इतर राज्यातील नागरिक स्थायी झाले आहे. त्यामूळे चंद्रपूरात सर्व धर्मीय उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. उत्तर भारतीय लोकांचा पावन महोत्सव म्हणजेच छटपूजा ही येथे दरवर्षी साजरी केली जात असते. यंदाही चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव, रयतवारी कॉलरी, पागलबाबा नगर, लालपेठ शिवमंदिर’ येथे छटपूजे निमीत्य कार्यक्रम पार पडला यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी या घाटांवर भेट देवून पूजा अर्चना केली. यावेळी आ. जोरगेवार यांनी नागरिकांना छट पूजे निमीत्य शुभेच्छा देत जगावर कोसळलेले कोरोनाचे संकट दुर होऊ दे अशी कामना केली.
