केंद्रीय मंत्री रामविलास पासवान याचे निधन

0
608

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान याचे निधन

केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

लोकजनशक्ती पार्टीचे नेते, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज (गुरुवार) रोजी निधन झाले.

मागील महिनाभरापासून मंत्री रामविलास पासवान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

नुकतीच त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतरच त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

दरम्यान, रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

चिराग यांनी ट्विट करत लिहिले की,

”पापा….अब आप इस दुनिया में नहीं हैं लेकिन मुझे पता है आप जहां भी हैं हमेशा मेरे साथ हैं, मिस यू पापा”

गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. दिल्लीतल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here