जिप शाळा व अंगणवाडी केन्द्रात आढळले अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य

0
372

जिप शाळा व अंगणवाडी केन्द्रात आढळले अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य

बालकांचे व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

नावंधर यांचेकडून पुरविले जाते धान्य

 

 

कोरपना तालुक्यातील विरूर व गाडेगाव येथील अंगणवाडी केंद्रात व जिल्हा परिषद शाळेमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे टोचलेले घुबड लागलेले कडधान्य आढळून आले असून मागील दोन महिन्यांपासून हेच कडधान्य शिजवून अंगणवाडी केंद्रातील बालकांना व शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून दिले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. प्रकल्प अधिकारी व शिक्षण विभाग या सर्व प्रकाराबाबत अनभिज्ञ असून अत्यंत निकृष्ट दर्जाचे कडधान्य शिजवून खाऊ घालत असल्याने बालकांचे व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे नांदाफाटा येथील पुरवठादार नावंधर यांच्याकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्याचा पुरविले जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली प्रकल्प अधिकारी व शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कोेरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांनी अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविणाऱ्या पुरवठादारावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

अनेक महिन्यांपासून घुबड लागून टोचलेले कडधान्य पुरवठादार नावंधर यांच्याकडून पोहचवून दिले जाते. धान्य मोजूनही दिले जात नाही पुरवठादाराला असे कडधान्य देऊ नका असे बोलली असता जसा माल आला तसाच देणार असे उत्तर देऊन घाईगडबडीने तो लवकर निघून जातो छोट्या मुलांना आहार द्यावा लागत असल्याने चांगल्या प्रतीचे धान्य मिळवून द्या अशी मागणी करीत आहे.
सिताबाई पिंपळकर
अंगणवाडी सेविका, विरूर

काही महिन्यांपूर्वी वाहनामध्ये खाली पडलेले धान्य जमा करून पिशवित भरून शाळेला पुरविले निकृष्ट दर्जाचे खराब धान्य असल्याने दुसरे धान्य देण्यास सांगितले असता जे धान्य येते तेच धान्य देतो असे पुरवठादार बोलला नेहमीच निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवितो ही नवीन बाब नाही. तालुक्यात चांगल्या दर्जाचे धान्य नियमित पुरवठा होण्याकरिता या पुरवठादारांवर कठोर कारवाई करून नवीन एजन्सीला पुरवठ्याचे काम देणे गरजेचे आहे.
संजय तोडासे, सहायक शिक्षक
जि.प. शाळा गाडेगाव

 

वेकोलीने शाळेकरिता नवीन इमारत बांधून दिली बाहेरगावून आलेल्या मित्रांना शाळेची इमारत दाखविण्याकरिता नेले असता शाळेची पाहणी करीत असताना टोचलेले घुबड लागलेले निकृष्ट दर्जाचे धान्य शाळेत व अंगणवाडी केंद्रात आढळून आले याबाबत शिक्षकांना व अंगणवाडी सेविकांना विचारणा केली असता अशाच धान्याचा पुरवठा केला जातो आम्ही काय करणार असे उत्तर त्यांनी दिले यानंतर आम्ही गाडेगाव येथील शाळेत व अंगणवाडी केंद्रात जाऊन पाहणी केली असता तिथेसुद्धा असाच प्रकार उजेडात आला प्रकल्प अधिकारी व गटविकास अधिकारी यांना याबाबतचे व्हिडिओ व फोटो व्हॉट्सअपवर माझ्या मित्रांनी पाठविले असून फोन करुन तोंडी तक्रार केली कारवाई करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहेत.
सुभाष दाढे, माजी सरपंच, विरुर (गाडेगाव)

सदर प्रकरण गंभीर आहे याबाबत अनेकदा तोंडी तक्रारी आहेत अंगणवाडी केंद्रात अन्नधान्य पोहोचता केले त्या दिवशी अंगणवाडी सेविकेने असे धान्य स्विकारु नये प्रकरणात सहानिशा व चौकशी करून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई नक्की प्रस्तावित करेल.
गणेश जाधव
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, कोरपना

अश्या पूरावठा धारकावर कठोर कारवाई करीता विनाविलंब चौकशी करु दोषी आढळल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे कारवाईकरिता प्रस्ताव पाठविणार आहेत.
विजय पेंदाम
गटविकास अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here