सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक नंदकिशोर माडुरवार सन्मानीत

183

सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक नंदकिशोर माडुरवार सन्मानीत

माडूरवार परिवार स्नेहमिलन सोहळ्याचे निमित्त

 

 

गोंडपिपरी– आपापल्या कामाच्या निमित्ताने या त्या ठिकाणी स्थाही झालेल्या माडूरवार परिवारातील सारीच मंडळी एकत्र आली.अन एकाच परिवारातील तिन पिढ्यातील आबालवृद्धांची कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली.यावेळी भावनिक नातेसंबंधाचे स्नेहमिलन पार पडले.या कार्यक्रमात चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त बँक व्यवस्थापक पदावर कार्यरत असतांना कर्तव्यापलिकडची सामाजिक बांधिलकी जोपासणारे नंदकिशोर माडुरवार यांना सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला आहे.

चंद्रपूर सह सम्पूर्ण राज्यात ईतरत्र आपापल्या नौकरी,व्यवसाय आणि कामाच्या निमित्तानं वास्तव्यास असलेल्या एकाच परिवारातील सदस्य एकत्र आले.तब्बल १४ वर्षानंतर त्यांच्या परिवारातील मुले, मुली,सुणा,जावई, आई वडील आणि नातवंडांची गाठभेट झाली.यावेळी सर्वांना झालेला आनंद गगणात मावेनासा झाला. हा भावनिक सोहळा बरेच काही सांगून गेला. माडूरवार परिवाराचे हे “स्नेहमिलन २०२२”नुकतेच कोठारी – तोहोगाव मार्गावरील बामणी काटवली येथील गोलेछा यांच्या अग्रोफॉर्म वर पार पडले.

“वसुदेव कुटुंबकम” ही संस्कृती इतकंच नव्हे तर हे विश्वची माझे घर, हे नेहमी ऐकत असतो.मात्र वॉट्सअॕप, फेसबुक, टेलिग्राम, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा विविध माध्यमातून जगाशी संपर्क साधण्यामध्ये व्यस्त झाल्याने मात्र आपली मानस आपल्यापासून नकळत दुरावल्याचा भास होतो.याचाच एक भाग म्हणून नुकतेच दिवाळीच्या तेजोमय वातावरणामध्ये या स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन माडुरवार परिवाराने केले होते.

यासाठी राज्यभरातून सर्व कुटुंब एकत्र आले. माडुरवार परिवाराने उद्योग, नौकरी, सामाजिक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे. आपापसातील नातेसंबंध अधिक दृढ व्हावे,एकमेकांच्या संपर्कात राहता यावे,याकरीता स्मरनिका प्रकाशन, परिचय, मनोरंजन,स्नेहभोजन,विचारांची देवाण घेवाण यादी उपक्रम यावेळी पार पडले.नवीन पिढीसाठी आदर्शवत ठरणारा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.या स्नेहमीलन सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी माडूरवार परिवारातील तब्बल २५० सदस्य एकत्र आले होते.यावेळी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी प्रयत्न करणारे। सोबतच बँक व्यवस्थापक असताना बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमिकरणाकरिता विधायक कार्य करणारे, सामाजिक बांधिलकी जोपासणारे स्नेहमीलन सोहळा समिती कोषाध्यक्ष नंदकिशोर माडुरवार यांचा सन्मात करण्यात आला.

यावेळी डॉ.अनिल माडूरवार,स्वयंभू कंट्रक्शन हिंगणघाटचे सर्वेसर्वा राजाभाऊ माडमवार,सुहास माडूरवार, विलास यादवराव माडूरवार,अजय माडूरवार,मंगेश माडूरवार, अविनाश माडुरवार,दिनकर माडुरवार, सतीश माडुरवार, सुरज माडूरवार, मुल येथील व्यापारी जीवन कोंतमवार,अनंतराव भास्करवार आदिंची उपस्थित होती.

advt