भामरागड येथे रक्तसाठा केंद्र सुरू करा रक्त दान शिबिरातून मागणी

0
267

भामरागड येथे रक्तसाठा केंद्र सुरू करा रक्त दान शिबिरातून मागणी

सांज माडिया स्वंस्थेचे नियमित उपक्रम

ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी सांज माडिया बिनागुंडा स्तिथ भामरागड या सामाजिक स्वयंसेवी स्वंस्थे द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरात एकूण ३३ रक्त दात्यानी स्व इच्छेने रक्तदान केले श्यामला उईके विशाखा मंडल लक्ष्मी सळमेक साईला जाधव या महिलांनी रक्तदान करून महिलांनी रक्त दान करण्यास समोर यावे असा आदर्श निर्माण केला यावेडी रक्तपेढी अहेरी येथील डॉ उमाडे व त्यांची चमू त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय भामरागड येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ भावेश वानखेडे व त्यांची वैधकिय चमू उपस्थित होती भामरागड तालुक्यात २०० चां वरती सिकल सेल (ss) रुग्ण असून रुग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते सिकल सेल व इतर रुग्णांना रक्ताची पूर्तता करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे रेफर करावे लागते भामरागड ते अहेरी हे अंतर जवळ पास ७५ किलोमिटर असल्याने रुग्ण उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे पोहोचण्या आधी रस्त्यामध्ये दगावतात ही गंभीर बाब मागील ३वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्त दात्या मार्फत शाषण प्रशषणा चे लक्षात आणून दिल्या जात आहे ग्रामीण रुग्णालय भामरागड येथील रक्ताची गरज लक्षात घेत रक्त साठा केंद्र सुरू झालेले नाही करिता शाशान प्रशाशाणानी या गंभीर बाबी कडे विशेष लक्ष देऊन भामरागड येथे रक्त साठा केंद्र सुरू करावे अशी मागणी रक्त दात्याणी केली आहे मागील तीन वर्षा पासून सांज माडिया बिनागुंडा स्तिथ भामरागड या स्वंस्ते द्वारा नियमित वर्षाला चार रक्तदान शिबिराचे आयोजन करून प्रत्येक वर्षी शेकड़ो ब्यग रक्त रक्तपेटी ला जमा करण्यात येथे तरी सुद्धा भामरागड येथे रक्त साठा केंद्र सुरू झालेले नाही याबद्दल रक्तदान शिबिराचे आयोजक कुमार रुपलाल मारोती गोंगले यांनी खंत व्यक्त केले आहे रक्त दान शिबिराचा यशस्वी करिता अनमोल चवरे शकील शेख रवी झोडे सतीश उइके शंकर अलाबिस इत्यादींनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here