ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्व. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन

0
573

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्व. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन

 

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी
घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शनिवार १५ ऑक्टोबर रोजी भारताचे मिसाईल मॅन स्व. माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी स्व. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.

मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, भारताच्या अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नात त्यांचा मोठा सहभाग होता. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जात होते. तसेच उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे अमोल थेरे, भास्कर वरारकर, मंगल कळस्कर, अशोक हागे, अशोक पिंपळकर, बंडू बोंडे, बंडू बोधे, प्रवीण दोडके, कार्तिक वरारकर, हर्ष बांदुरकर, बबलू सातपुते, संदीप ताजने, संतोष ताजणे, निशा उरकुडे, प्रीती धोटे, लता आवारी, सुनंदा लिहीतकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here