विवेक बोढे हे सेवेसाठी व्रतस्थ व्यक्तीमत्व! आमदार देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन

0
3

विवेक बोढे हे सेवेसाठी व्रतस्थ व्यक्तीमत्व! आमदार देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन

रुग्णसेवक विवेक बोढे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 

घुग्घुस, दि.१२
भाजपचे जिल्हा महामंत्री आणि आपल्या सेवाभावी कार्यासाठी ओळखले जाणारे व्यक्तीमत्व श्री. विवेक बोढे यांचा वाढदिवस ११ मे रोजी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केवळ औपचारिक सोहळा न करता, या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ पासूनच भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या घरी त्यांच्या शुभेच्छुकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी गेली होती. त्यांच्या घरी केक कापून त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

शहरातील प्रत्येक प्रभागात भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा केक कापण्यात आला तसेच त्यांचे स्वागत करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

ऑटो व डग्गा संघटनेतर्फे बसस्थानक चौकात भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शीतपेयाचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ घुग्घुसतर्फे पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार बांधवांनी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सायंकाळी प्रयास सभागृहात भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सत्कार समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी घुग्घुसचे भूमिपुत्र तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे म्हणाले विवेक बोढे हे खरे रुग्णसेवक आहे त्यांनी अनेक अपघातग्रस्त युवकांचे प्राण वाचविले अपघातग्रस्तांना स्वतः आर्थिक मदत दिली तसेच अपघातात मृत्यू झालेल्या अनेक युवकांच्या कुटुंबियांना कंपनीतर्फे आर्थिक मोबदला मिळवून देण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका ही बाब अत्यंत प्रशंसनीय आहे. घुग्घुस येथील मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून शेकडो रुग्णांची तुकडी विविध आजारांवर उपचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात रवाना केली. शहरात टँकरने नागरीकांना मोफत जलसेवा सेवा दिली त्यामुळे ते जलसेवक सुद्धा आहे.

भाजपा जिल्हा महामंत्री यांच्या केक कापण्यात आला शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा विवेक बोढे यांना विवेक बोढे मित्रपरिवारतर्फे भेट देण्यात आली.

याप्रसंगी आपल्या मनोगतामध्ये श्री. विवेक बोढे यांनी सर्वांचे आभार मानले आणि यापुढेही समाजासाठी कार्यरत राहण्याचा आपला मानस व्यक्त केला. त्यांचा वाढदिवस हा केवळ एक वैयक्तिक आनंदाचा क्षण न राहता, सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला.

या कार्यक्रमाला चंद्रपूर महानगर भाजपाचे राहुल पावडे, भाजपाचे सुरेंद्र भोंगळे, किरण बांदूरकर, गणेश कुटेमाटे, प्रमोद भोस्कर, महेश देवकते, इर्शाद कुरेशी, हेमराज बोंबले, वसंता भोंगळे, नितीन काळे, असगर खान, विनोद चौधरी, रत्नेश सिंग, सुरेंद्र भोंगळे, तुलसीदास ढवस, सचिन कोंडावार, श्रीकांत सावे, (विवेक गुड्डू) तिवारी, बबलू सातपुते, दिनेश बांगडे, अनिल मंत्रिवार, मधुकर मालेकर, चिन्नाजी नलभोगा, रवी चुने, निळकंठ नांदे, सिनू इसारप, धनराज पारखी, प्रयास सखी मंचच्या अर्चना भोंगळे, किरण बोढे, सुनंदा लिहीतकर, नितु चौधरी, सुचिता लुटे, पूजा दुर्गम व मोठया संख्येत नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here