प्रियदर्शनीच्या विद्यार्थिनीनी दिल्या ‘मानवी साखळी’तून रामाळा बचावच्या घोषणा

0
199

प्रियदर्शनीच्या विद्यार्थिनीनी दिल्या ‘मानवी साखळी’तून रामाळा बचावच्या घोषणा

बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाला विद्यार्थिनीचे समर्थन

चंद्रपूर/प्रतिनिधी । रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील प्रियदर्शनी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी एकत्रित येत सर्वप्रथम रामाला तलाव वाचविण्यासाठी ‘मानवी साखळी’ तयार केली.

आज (27 फेब्रुवारी) रोजी बंडू धोतरे यांच्या अन्नत्याग सत्याग्रह उपोषणाच्या सहाव्या दिवशी आंदोलनास आपले समर्थन जाहीर करीत घोषणा दिल्या. आज उपोषणाचा 6 वा दिवस आहे. यावेळेस विद्यार्थिनींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत रामाला तलावाचे प्रदूषण आणि वाचविण्याची गरज स्पष्ट केली.
यावेळेस प्रियदर्शनी कन्या विद्यालय चंद्रपूर वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत, “रामाला तलावालगत ही शाळा असून, तलावाच्या प्रदूषणाने सतत दुर्गंधीचा सामना शाळेतील विद्यार्थिनींना करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून याबाबत अनेक निवेदने शाळेतर्फे प्रशासनास दिली आहेत. मात्र वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्याअनुषंगाने ऐतिहासिक रामाळा तलावाचे संवर्धनासाठी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू करून चंद्रपूर शहरातील जनतेची जनजागृती झाली आहे व त्या संदर्भात चंद्रपूर शहरातील जनतेची रोषाचे वातावरण आहे, असे निवेदनातून व्यक्त करण्यात आलेली आहे. यावेळी मुख्याध्यापिका आशा दाते यांच्या नेतृत्वात सर्व शिक्षकांनी उपोषण मंडप मध्ये भेट दिली.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here