विरूर स्टेशन वन परिक्षेत्र अधिकारी देवराव पवार यांच्या मार्गदर्शाखाली वन्य जीव सप्ताह निमित्त जनजागृती रॅली

0
387

विरूर स्टेशन वन परिक्षेत्र अधिकारी देवराव पवार यांच्या मार्गदर्शाखाली वन्य जीव सप्ताह निमित्त जनजागृती रॅली

विरुर स्टे./राजुरा : वनपरिक्षेत्र अधिकारी, विरुर यांच्या सुचनेनुसार 7 आक्टोंबर ला वन्यजीव सप्ताह कार्यक्रम आपआपल्या उपक्षेत्रात साजरा करण्यात आला. वनपरिक्षेत्र विरूर, उपक्षेत्र अंतरगाव, बिट सुबई, जि. प. प्राथमिक शाळा सुबई येथे वन्य जीव सप्ताह निमित्त रॅली काढून जनजागृती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

विरूर वनपरिक्षेत्र, अंतरगाव-राऊंड, अंतरगाव-बिट, सुब्बई जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुब्बई येथे वन्यजीव सप्ताह निमित्त काढलेल्या रॅलीत वनकर्मचारी तसेच शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांसह स्थानिक ग्रामस्थ सहभागी होते. यावेळी गावातील वामविभागांतर्गत गॅस शेगडी चे वाटप करण्यात आले.

वन परिक्षेत्र अधिकारी देवराव पवार यांच्या मार्गर्शनाखाली वनकर्मचारी उपस्थित होते. यात श्री. गोरे, श्री. गोविंदवार, श्री. राठोड, श्री. मस्ताने, श्री. कमलापुरकर, श्री. रायपूरे, प्रियंका मॅडम यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here