विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत

0
479

विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत

ग्रामदर्शन विद्यालय खडसंगी चा उपक्रम

 

तालुका प्रतिनिधी
चिमूर

तालुक्यातील खडसंगी येथील ग्रामदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील एका गंभीर आजाराच्या विद्यार्थ्यांस उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे.विद्यालयात इयत्ता ८ व्या वर्गात शिक्षण घेणारा विद्यार्थी विवेक विजय गेडाम हा अनेक दिवसांपासून शाळेत गैरहजर होता.दरम्यान चौकशी करीता प्राचार्य सदाशिव मेश्राम हे सदर विद्यार्थ्यांच्या घरी गेले असता त्यांना पालकांनी त्याच्या प्रकृतीचे कारण सांगितले.सदर विद्यार्थ्यांला पोटाचा गंभीर आजार असून डॉक्टरानी त्याला शस्त्रक्रिया करावी लागेल अशी बतावणी केली आहे.

ही बाब प्राचार्य सदाशिव मेश्राम यांनी विद्यालयात कार्यरत असणाऱ्या सहकाऱ्यांना लक्षात आणून दिली आपली सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व सहकाऱ्यांनी प्राचार्य मेश्राम यांच्या पुढाकारात आर्थिक रक्कम गोळा करून शनिवारला सदर विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याच्या पालकांच्या स्वाधीन केली. या वेळी त्याचे पालक विजय गेडाम यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here