शेतकऱ्यांना मोफत घरपोच ७/१२

0
641

शेतकऱ्यांना मोफत घरपोच ७/१२

गांधी जयंती दिनी शासनाचा उपक्रम

बल्लारपूर (चंद्रपूर), राज जुनघरे
बल्लारपूर तहसील मधील मौजा विसापूर येथे महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून महाराष्ट्र शासनाचा शेतकऱ्यांना मोफत घरपोच 7/12 वाटप अभियानाची सुरुवात तहसील कार्यालय बल्लारपूर कडून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सुर्यवंशी होते. तर प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सदस्य ऍड. हरीश गेडाम, पंचायत समिती सदस्य गोविंदा भाऊ पोडे, विद्या गेडाम यांची उपस्थिती होती. तसेच विसापूर येथील सरपंच वर्षा कुळमेथे आणि उपसरपंच अनकेशवर मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी तेथील शेतकरी यांना पाहुण्यांचे हस्ते मोफत 7/12 चे वितरण. करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सुर्यवंशी यांनी सांगितले की टप्प्याटप्याने तालुक्यातील सर्व गावातील शेतकर्‍यांना मोफत डिजिटल गाव नमुना 7/12 वाटप करण्यात येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय राईंचवार तहसीलदार बल्लारपूर यांनी केले. संचालन अजय मेकलवार लिपिक, तर आभार प्रदर्शन सतीश साळवे नायब तहसीलदार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी रोहीत चव्हाण तलाठी आणि सर्व तहसील कार्यालयाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here