राजुरा येथे दुचाकी दुभाजकाला आदळून अपघात, एक ठार दोघे जखमी

0
2411

राजुरा येथे दुचाकी दुभाजकाला आदळून अपघात, एक ठार दोघे जखमी

 

राजुरा, ७ डिसें. : काल संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास आसिफाबाद रोड माणुसमारे इलेक्ट्रॉनिक्स समोर दुभाजकाला दुचाकी आदळल्याने दुर्दैवी अपघात झाला. यात एक मुलगा जागीच ठार झाला असून दोघांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार एकच कुटुंबातील तीन सख्खे भाऊ दुचाकीने जात असताना दुचाकी दुभाजकाला आदळली. आई वडील व तीन मुले असा परिवार असून ते आझाद चौक राजुरा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. किशोरवयीन मुलगा गेल्याने कुटुंब दुःखात बुडाले असून हळहळ व्यक्त केली जात आहे. दुचाकीवर असलेले तिघेही भाऊ खाली पडले. यात आतिफ शेख (११) हा मरण पावला. ट्रॅक्टर ट्रालीला आदळल्याने त्याचा मृत्यू झाल्याची अंदाज आहे. तर जुमान शेख (१४) व फैजान शेख (८) ह्या दोन भावांना सुद्धा गंभीर दुखापत झाली असून उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी
सध्या शहरात कर्ण कर्कश हार्ण वाजवून नागरिकांची तारांबळ उडविली जात आहे. तसेच १८ वर्षाखालील मुले सुद्धा दुचाकी वाहन चालवत असल्याचे दिसून येत असून हिरोगोरीने ओव्हरटेक करणे, सुसाट वेगाने वाहने चालविणे असे प्रकार सर्रास होताना दिसून येत आहेत. यामुळे प्रवाशांना व जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here