वढोलीच्या तलाठ्यावर निलंबनाची कार्यवाही करा

0
608

वढोलीच्या तलाठ्यावर निलंबनाची कार्यवाही करा

वढोलीवासीय करणार सोमवारपासून उपोषण

 

गोंडपिपरी विविध विभागाचा आढावा घेण्याकरिता ग्रामपंचायत वढोली येथे ग्रामसभा आयोजीत करण्यात आली. महसूल विभागाची वेळ आली तेव्हा नागरिकांनी तलाठयावर ताशेरे ओढले. दाखल्यांसाठी पैसे घेणे, कामासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावयास लावणे यामुळे नागरिक संतप्त झाले.

यावर सरपंचांनी जाब विचारला असता ‘मी तुमच्या बापाचा नौकर नाही’ असे उघ्दटपणे बोलले. यानंतर प्रकरण हातापाईवर आले. या सगळया प्रकारांनतर तलाठी बल्की यांच्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आलीे. ग्रामसभेचा ठराव घेत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेत सोमवारपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत वढोली येथे नुकतीच ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी सरपंच राजेश कवठे यांनी सभा बोलाविली. सर्व विभागाचा आढावा पार पडल्यानंतर महसूल विभागाची वेळ आली. यावेळी वढोली साजा चे तलाठी जनार्धन बल्की उपस्थित होते.

या दरम्यान नागरिकांनी बल्की यांच्या कारभारावर प्रचंड ताशेरे ओढले. शेतकरी बांधवांना कामासाठी दिवसोदिवस ताटकळत ठेवणे, कामासाठी दलाल नेमून शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून पैसे घेणे, पुरबुडी व अतिवृष्टीच्या मदतीची रक्कम देण्याकरिता पैसे घेणे या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी बल्की यांच्यावर संताप व्यक्त केला.

यावेळी बल्कींना उपस्थित नागरिकांनी जाब विचारला असता मी तुमच्या बापाचा नौकर नाही.मला विचारणारे तुम्ही कोण अशा शब्दात बल्कींनी नागरिकांनाच सुनावले.

यावेळी सरंपच राजेश कवठे यांनी आक्रमक पावित्रा घेतला. व जाब विचारला असता बल्कींनी सरंपचांना मी तुला ओळखत नाही.तू कोण आहेस असे उर्मट उत्तर दिलेे. तलाठयाची हि मुजोरी लक्षात घेता सरपंच व गावकरी आक्रमक झाले.

यावेळी हातापाईवर वेळ आली. पण काहींनी मध्यस्ती केल्याने प्रसंग टळला. यानंतर गावकऱ्यांचा आक्रमक पावित्रा लक्षात घेता तलाठी बल्कींनी ग्रामसभेतून पळ काढला. या संपुर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच गाजत आहे.

प्रशासनाचा प्रतिनीधी शेतकरी बांधवांचे काम करण्याचे सोडून अरेरावीपणा करतो, अवैधरित्या पैसे कमवितो या मुळे सरपंचासह गावकऱ्यांनी तहसिलदारामार्फतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बल्कीची तक्रार केली आहे. ग्रामसभेचा अपमान करणाऱ्यावर फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या मागणीला घेता सोमवारपासून तहसिल कार्यालयासमोर वढोलीवासीय आमरन उपोषन करणार आहेत.

पत्रपरिषदेला सरपःच राजेश कवठे, संदीप लाटकर, सःदीप पौरकार, राहूल सोनटक्के, तंटामुक्त समिती अध्यक्ष शामराव सोनटक्के यांची उपस्थीती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here