आ.चंद्रकांत पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट तर भेटीमागे खडसेंच्या संभाव्य प्रवेशाची किनार

0
416

जळगाव जिल्हा प्रतिनिधी- विशाल सुरवाडे

भारतातील जनता पक्षातील अस्वस्थ ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे संभाव्य पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. बुधवारी मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी खडसेंच्या विषयावर जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची एकत्रित बैठक घेतली.

दरम्यान, खडसेंचे कट्टर विरोधक तथा मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील या बैठकीवेळी राष्ट्रवादी कार्यालयात उपस्थित राहून खासदार शरद पवारांची स्वतंत्र भेट घेतली. त्यामुळे तेथे उपस्थित अनेकांच्या भुवया उंचावल्या.

आता खडसेंना राष्ट्रवादी पक्षात घेणार असल्याचे कानावर आल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादीच्या बैठकीवेळी खासदार शरद पवार यांची भेट घेतली.

दरम्यान याच विषयावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आमदार चंद्रकांत पाटील आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांना बोलावून यासंदर्भात खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान, एकनाथ खडसेंच्या संभाव्य प्रवेशाबाबत आमदार पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. आमदार पाटील यांच्या भेटीच्या वृत्ताला अॅड.रवींद्र पाटील यांनी दुजोरा दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here