माता महाकाली महोत्सवाला राज्यपालांना भेट देण्याची आमदार किशोर जोरगेवारांनी केली विनंती

0
392

माता महाकाली महोत्सवाला राज्यपालांना भेट देण्याची आमदार किशोर जोरगेवारांनी केली विनंती

 

चंद्रपूर येथील माता महाकाली जागृत देवीचे मंदिर आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान, पर्यटनाच्या आणि वास्तुकलेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण वास्तू आहे. विदर्भातील अष्ट शक्तिपीठांपैकी एक म्हणजे चंद्रपूरची माता महाकाली मंदिर आहे. चैत्र पौर्णिमे दरम्यान येथे मोठी यात्रा भरते.

राज्यातून तसेच छत्तीसगड, तेलंगाना व आंध्रप्रदेशातील लाखों भाविकांची या यात्रेला अलोट गर्दी उसळते. भावभक्तीचा जागार आणि भाविकांची अतूट श्रद्धा ची सांगड घालत यावर्षीपासून जनसहभागातून नवरात्री उत्सवादरम्यान “माता महाकाली महोत्सव” चे आयोजन करण्यात येत आहे.

त्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम श्री. भगत सिंह कोश्यारी साहेब यांनी भेट द्यावी अशी विनंती मी स्वतः सहकार्यांसोबत च्या सदस्यांना घेऊन राजभवन येथे केली. त्यावर राज्यपाल महोदयांनी सकारात्मक उत्तर दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here