जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

0
411

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दक्षता व नियंत्रण समितीचा आढावा

 

 

चंद्रपूर,दि. 19 सप्टेंबर: सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, जादुटोणा विरोधी समिती व सेवा पंधरवडा कामकाजाचा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात झालेल्या या बैठकीला सहायक आयुक्त अमोल यावलीकर, महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किन्नाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, डॉ. मीना मडावी, डॉ. पद्मजा बोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता तालुकास्तरावर गठीत समितीच्या नियमित बैठका घ्याव्या. त्यासोबतच गटविकास अधिकारी यांच्या प्रशिक्षणासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करावे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर कालावधीत सेवा पंधरवाडा राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत तृतीयपंथी व्यक्तींना राशन कार्ड, वोटिंग कार्ड तसेच ट्रान्सजेंडर प्रमाणपत्राचे वितरणासाठी कॅम्प आयोजित करावे. 1 आक्टोंबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळा व महाविद्यालयामध्ये शिबिराचे आयोजन करुन जात व जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण करावेत, आरोग्य तपासणी शिबिर आदी उपक्रम राबवावेत, अशा सुचना यावेळी केल्या.

बैठकीत अत्याचारग्रस्तांना आर्थिक सहाय्याची पात्र व मंजूर प्रकरणे, ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत पोलिस तपासावर प्रलंबित तसेच न्यायालयात प्रलंबित गुन्ह्याची प्रकरणे, न्यायप्रविष्ठ गुन्ह्यांची सद्यस्थिती आदीची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here