झाडीपट्टी रंगभूमीचा पाठीराखा म्हणून कलाकारांच्या सुखादुखात सदैव पाठीशी राहणार – माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार

0
395

झाडीपट्टी रंगभूमीचा पाठीराखा म्हणून कलाकारांच्या सुखादुखात सदैव पाठीशी राहणार – माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार

 

 

झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकातील कलावंत हे आपल्या अभिनयातून दुखी चेहऱ्यांवर हास्य निर्माण करतात. हे खरे धन असून झाडीपट्टीतील कलावंत या धनाने समृद्ध आहे.
झाडीपट्टीची भुमी ही कष्टकऱ्यांची भुमी असुन रंगभूमीचे प्रेक्षक हे कष्टकरी आहेत. नाटकाच्या माध्यमातून गावखेड्यातील लोकांचे प्रबोधन कलावंत करत असतात. हे अभिमानास्पद बाब आहे. विद्यार्थी जिवनात असतांना मी स्वतः नाटकांमध्ये अभिनय केलेला असल्याने मला नाटक व कलावंत याबाबत विशेष आपुलकी असुन मी सदैव झाडीपट्टी रंगभूमीच्या पाठीशी आहे. असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रम्हपुरी शहरात आयोजित झाडीपट्टीच्या ४ थ्या नाट्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

ब्रम्हपुरी शहरात १२ कोटी रुपयांच्या निधीतून नाट्यसभागृह मंजुर असुन काम प्रगतीपथावर आहे.पुढल्या काळात आपण ब्रम्हपुरी येथे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून नाट्य अकादमी सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार. यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून ही मागणी यावर्षीच पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न करणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी झाडीपट्टीतील कलावंतांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार, संमेलनाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, न.प. उपाध्यक्ष अशोक रामटेके, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी संमेलनाध्यक्ष परशुराम खुणे, माजी संमेलनाध्यक्ष शेखर डोंगरे, डॉ. मंगेश बन्सोड, अब्दुल गणी, युवराज प्रधान, सदानंद बोरकर यांची यावेळी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here