अभयारण्याच्या कुशीतील पवनची नवोदयसाठी निवड

0
677

अभयारण्याच्या कुशीतील पवनची नवोदयसाठी निवड
पोंभुर्णा तालुका वासीयांकडून कौतुक

राज जुनघरे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
कन्हाळगाव अभयारण्याच्या घनदाट विस्तिर्ण जंगलाच्या

कुशित वसलेल्या आणि पोभुर्णा तालुक्यातील आदिवासी

बहूल भटारी गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक

शाळेतील पवन ज्ञानेश्वर मरस्कोल्हे या विद्यार्थ्यांची

शैक्षणिक सत्र २०२२-२३ करीता आणि पुढील शिक्षणासाठी जिल्ह्यातील नवोदय विद्यालय, बाळापूर (तळोधी) येथे निवड झाली आहे.

पोभुर्णा तालुक्यातील भटारी ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा

ही आदिवासी बहुल अतिसंवेदनशील, दुर्गम भागात

मोडत असून तालुक्यातुन नित्य या शाळेतील विद्यार्थी स्कॉलरशिप व नवोदय च्या परिक्षेत अवल स्थान निर्माण करीत असतात.

या वर्षीच्या सत्रातुन पवन ज्ञानेश्वर मरस्कोल्हे याची निवड झाली असल्याने पोभुर्णा येथील माजी सभापती अल्का आत्राम, माजी उपसभापती विनोद देशमुख, ग्रा.प. सदस्य रमेश वेलादी, सुवर्णा पेंदोर यांनी भेटवस्तू व शाल श्रीफळ देऊन पवनचे अभिनंदन करीत कौतुकाची थाप दिली.

तसेच पवनचे मार्गदर्शक शिक्षक विनोद बावणे या प्रसंगी अभिनंदन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक

महादेव कुळसंगे, सहाय्यक शिक्षक सुरेश नगराळे, भाषा विषयशिक्षक राहुल पिंपळशेंडे, विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here